Pune Fire News: पुण्यातील गर्ल्स हॉस्टेलला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पुण्यातील रास्ता पेठेतील एका विद्यार्थीनींच्या वसतीगृहात भीषण आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Pune Fire News: पुण्यातील रास्ता पेठेतील एका विद्यार्थीनींच्या वसतीगृहात भीषण आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. हिटरमुळे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत हॉस्टेलमधील अनेक महत्वाचे सामान जळून खाक झाले आहे. परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील ताराचंद रुग्णालयाजवळी एका विद्यार्थीनीच्या हॉस्टेला हिटरमुळे आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली.तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरु केले. तीन मजली वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चार मध्ये आग लागली होती.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement