Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसी मध्ये महिन्याभरात दुसर्यांदा भीषण स्फोट झाल्याने आग (Watch Video)
अभिनव शाळा च्या बाजूला असलेल्या एका पेस्टीसाईड कंपनीलाही आग लागली आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.
डोंबिवली एमआयडीसी मध्ये महिन्याभरात दुसर्यांदा भीषण स्फोट झाल्याने आग भडकल्याची घटना समोर आली आहे. आज 12 जून दिवशी इंडो अमाइन्स या कंपनीत मोठा स्फोट झाला असून भीषण आग लागली आहे. स्फोटाचे पुन्हा मोठे आवाज झाल्याने आजुबाजूच्या भागातील रहिवासी भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कर्मचार्यांना बाहेर काढण्यात यश आल्याने अद्याप कोणतीही जीवितहानी नसल्याचे सांगण्यात आले आहे. Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video).
Dombivli MIDC मध्ये आग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)