Ghatkopar Gujarati Signboard: घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पेटला, बोर्ड हटवल्यानंतर गुजराती भाषिक रस्त्यावर

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये एका उद्यानात लावण्यात आलेला 'मारो घाटकोपर' हा गुजराती बोर्ड तोडला होता.

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पेटणार आहे. घाटकोपर परिसरात लावण्यात आलेले गुजराती भाषेतील बोर्ड हटवले होते. बोर्ड हटवल्यामुळे गुजराती भाषिक आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत.  गुजराती भाषेतील बोर्ड हटवल्याचा गुजराती बांधवानी निषेध व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये एका उद्यानात लावण्यात आलेला 'मारो घाटकोपर' हा गुजराती बोर्ड तोडला होता. घाटकोपर पूर्वेकडील आर बी मेहता मार्गावरच्या चौकाला देण्यात आलेल्या गुजराती नावाचा फलक मनसे कार्यकर्त्यांकडून तोडण्यात आला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now