Marathi Translation Court's Judgments: आता सुप्रीम कोर्ट तसेच मुंबई हायकोर्टाच्या निकालांचे होणार मराठीत भाषांतर; महाराष्ट्र सरकारकडून 6 लाखांहून अधिक निधी मंजूर
महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट रोजी पारित केलेल्या ठरावानुसार, मायक्रोसॉफ्ट फॅमिली सॉफ्टवेअर आणि गुगल ट्रान्सलेटर खरेदी करण्यासाठी 6,47,320 रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्यासाठी सॉफ्टवेअर खरेदीसाठी महिन्यात 6 लाख रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट रोजी पारित केलेल्या ठरावानुसार, मायक्रोसॉफ्ट फॅमिली सॉफ्टवेअर आणि गुगल ट्रान्सलेटर खरेदी करण्यासाठी 6,47,320 रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. मार्च 2023 मध्ये उच्च न्यायालयाने इंग्रजी निकालांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सहाय्यक कायदेशीर अनुवाद समितीने त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. आता राज्य सरकारने एक ठराव जारी केला ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषेसाठी 300 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. (हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतली NITI Aayog च्या सीईओंची भेट; मुंबईच्या आर्थिक विकासावर चर्चा, जाणून घ्या सविस्तर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)