Maratha Reservation: बीडमध्ये आंदोलकांनी लावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला आग; शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू (Video)
सोमवारी सकाळी आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानाची तोडफोड आणि आग लावली होती.
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होत आहे. मराठा आरक्षण आंदोलकांनी आज सायंकाळी बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला आग लावली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी राज्यमंत्री जय क्षीरसागर यांच्या घरांनाही आग लावली. याआधी सोमवारी सकाळी आंदोलकांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानाची तोडफोड आणि आग लावली होती. बीडमधील त्यांच्या राहत्या घरी आग लावली तेव्हा प्रकाश सोळंके हे कुटुंबासह घरात उपस्थित होते. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सीआरपीसी 144(2) अन्वये जिल्हा मुख्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयापासून 5 किलोमीटर परिघात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात आज झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. बीड शहरात सोमवारी दिवसभरात घडलेल्या आंदोलन आणि विघातक घटनेमुळे आतापासून पुढल्या अनिश्चित काळापर्यंत ही जमावबंदी करण्यात आली आहे. (हेही वाचा: अभिनेता रितेश देशमुखची मनोज जरांगे यांच्या तब्येत आणि मराठा आरक्षणाबाबतची पोस्ट व्हायरल)