Manoj Jarange Patil: फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीने पुष्पवृष्टी, मनोज जरांगेंची बीडमध्ये रॅली
हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील भव्य शांतता रॅलीनंतर गुरुवारी बीडमध्ये ही रॅली होत आहे.
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये रॅली पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने शांतता रॅलीला सुरुवात झाली. मराठा आरक्षणातील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने 13 जुलै पर्यंत वेळ मागितला आहे. त्यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागृती शांतता रॅली पार पडत आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील भव्य शांतता रॅलीनंतर गुरुवारी बीडमध्ये ही रॅली होत आहे. यावेळी जरांगे समर्थकांनी, 'जरांगे पाटलांचा बालेकिल्ला, बीड जिल्हा बीड जिल्हा' व 'छत्रपती शिवाजी कि जय' या घोषणेने शहर दणाणून गेले आहे.
पोस्ट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)