Manoj Jarange Patil Withdraws Hunger Strike: मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी दुपारी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उपोषण मागे घेताना त्यांनी कार्य्क्रत्यांना सांगितले की, न्यायालयाने त्यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. आज सायंकाळी पाच वाजता ते उपोषण सोडणार असल्याची माहिती आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली होती. गेल्या आठ दिवसांत जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देत, उपोषण मागे घेण्याची विनंती करत अनेक मंत्र्यांनी मनोज यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली होती. गेल्या 17 सप्टेंबरपासून सुरू झालेले जरांगे यांचे हे सहावे उपोषण होते. मराठ्यांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात ओबीसी कोटा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. उपोषणाला स्थगिती देताना ते म्हणाले की, निवडणुकीपर्यंत जर आरक्षण दिल नाही तर सगळी निवडणूक बिघडवणार आहे, माझ्या स्वतःसाठी मी आंदोलने करीत नाही. (हेही वाचा: Internal Politics in BJP: अमित शाह यांच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्याकडे बोट; भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळली)
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित-
Manoj Jarange Maratha Protest | मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित, अंतरवली सराटीत आंदोलकांचा जल्लोष#manojjarangepatil #maratha #manojjarange #marathaaarakshan #marathareservation #maharashtra #jaymaharashtra #jayshivray #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #shivaji pic.twitter.com/QygEKKkGpB
— Shreshth Maharashtra (@shreshthamaha) September 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)