Man Jumped From Upper Floor Of Mantralaya: मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून व्यक्तीने मारली उडी; सुरक्षा जाळ्यात अडकला (Watch Video)
मात्र त्यानंतर तो इमारतीत बसवलेल्या सुरक्षा जाळ्यात अडकला.
Man Jumped From Upper Floor Of Mantralaya: मुंबईमधील मंत्रालयामध्ये आधी अनेकवेळा आत्महत्येचे प्रयत्न झाले होते. आता आज पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली होती. मात्र त्यानंतर तो इमारतीत बसवलेल्या सुरक्षा जाळ्यात अडकला. या घटनेनंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब व्यक्तीला पोलिसांनी वाचवले. सध्या पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याआधी मार्च महिन्यातही एका व्यक्तीने असाच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. (हेही वाचा: World's Largest Stepwell: पुण्यात बांधली जात आहे जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहीर; तब्बल 500 वर्षानंतर होत आहे असा पहिला जलसंधारण प्रयत्न)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)