Terror Attack Hoax Call: मंत्रालयात फोन करून 2-3 दिवसात दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणार्‍याला अटक - मुंबई पोलिसांची माहिती

येत्या 2-3 दिवसात दहशतवादी हल्ला घडवून आणल्याच्या धमक्या फोनवरून देण्यात आल्या होत्या.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्र मंत्रालयात फोन करून दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा कॉल करणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी काल रात्री अटक  केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने फोन वर येत्या 2-3 दिवसात दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचं म्हटलं आहे. कांदिवली पोलिसांनी 61 वर्षीय Prakash Kishanchand Khemani या व्यक्तीला यामध्ये अटक केली आहे. आज त्याला कोर्टात सादर केले जाणार आहे.  काही दिवसांपूर्वी पुण्यात पकडलेल्या 2 दहशतवाद्यांकडे छाबड हाऊसचे फोटो मिळाल्यानंतर मुंबई पोलिस अलर्ट मोड वर आली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now