सातारा इथं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने झालेल्या तेविसाव्या राज्यस्तरीय ग्रीक-रोमन स्टाईल कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या मल्लांनी निर्विवाद वर्चस्व राखले आहे. महिला गटात कोल्हापूर संघाने जेतेपद पटकावल्यानंतर, पुरुष गटात ग्रीक-रोमन प्रकारातही कोल्हापूर संघाचा वरचष्मा राहिला. अभिजित पाटील, विक्रम कुराडे, अमृत रेडकर, समीर पाटील, आणि शिवाजी पाटील या कोल्हापूरच्या कुस्तीगिरांनी सुवर्णपदक पटकावले. मुंबईचे गोविंद यादव आणि गोकुळ पाटील, नाशिकचा मनोज कातोरे, लातूरचा अक्षय शेळके आणि पुण्याचा तुषार डबे यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्णपदकांची लयलूट केली.
कोल्हापूरच्या कुस्तीगिरांनी सुवर्णपदक पटकावले
#सातारा इथं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने झालेल्या तेविसाव्या राज्यस्तरीय ग्रीक-रोमन स्टाईल कुस्ती स्पर्धेत, कोल्हापूरच्या मल्लांनी निर्विवाद वर्चस्व राखल.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)