Maharashtra Shahir: 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमात उलगडणार साने गुरूजी- शाहीर साबळे यांच्यातील गुरूशिष्याचं नातं; आज साने गुरूजींच्या जयंती निमित्त त्यांच्या भूमिकेची खास झलक रसिकांच्या भेटीला

'महाराष्ट्र शाहीर' सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे.

शाहीर साबळे । Instagram

केदार शिंदे दिग्दर्शित आगामी सिनेमा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) मध्ये शाहीर साबळेंच्या आयुष्यात गुरूस्थानी असलेल्या साने गुरूजींसोबतचंही नातं उलगडणार आहे. आज साने गुरूजी यांच्या जन्मदिनानिमित्त केदार शिंदेंनी खास पोस्टर शेअर केलं आहे. त्यामधून साने गुरूजींची भूमिका साकारणार्‍याचं पात्राचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. दरम्यान ही भूमिका अभिनेता अमित डोलावत साकारत आहे. हा सिनेमा 23 एप्रिल 2023 दिवशी रीलिज होत आहे. नक्की वाचा: 'चंद्रा' गाणं गाऊन वायरल झालेल्या जयेश खरे शाळकरी मुलावर संगीतकार Ajay Atul फिदा; ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमात दिली गाण्याची संधी (watch Video) .

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now