Maharashtra Rain Update: येत्या 3-4 तासांत कोल्हापूर, पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

यासह वादळासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

यंदाचा मान्सून पुढच्या अवघ्या चार दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढचे चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आज संध्याकाळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. अहवालानुसार, येत्या 3-4 तासांत कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, सांगली, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, जालना या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह वादळासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

(हेही वाचा: Monsoon Update: मान्सून पुढच्या काहीच दिवसात केरळात, महाराष्ट्रात कधी? कसे असेल राज्यातील हवामान? घ्या जाणून)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif