Maharashtra Politics: शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट; जाणून घ्या दोन्ही नेत्यांमध्ये काय झाली चर्चा (Video)
महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाल्यानंतर 14 जुलै रोजी अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांनी एकमेकांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते. विधानभवनाच्या केबिनमध्ये तीनही नेत्यांमध्ये संवाद झाला. उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, बैठकीत त्यांनी अजित पवारांना राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. या भेटीचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाल्यानंतर 14 जुलै रोजी अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. (हेही वाचा: Pune BJP: पुणे भाजपमध्ये खांदेपालट, धीरज घाटे, शंकर जगताप यांच्यावर नवी जबाबदारी)