Maharashtra Politics: उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात सोबत एन्ट्री! एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या (Watch Video)

अगदी हसतमुखाने गप्पा मारत रोज एकमेकांवर टीका करणाऱ्या दोघांनीही विधानभवनात प्रवेश केला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांनी विधानभवानत एकत्र प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला. अगदी हसतमुखाने गप्पा मारत रोज एकमेकांवर टीका करणाऱ्या दोघांनीही विधानभवनात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, (Aditya Thackeray) अंबादास दानवे (Ambadas Danave) आणि ठाकरे गटाचे इतर आमदार उपस्थित होते. शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)