Maharashtra Politics: उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात सोबत एन्ट्री! एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या (Watch Video)
सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला. अगदी हसतमुखाने गप्पा मारत रोज एकमेकांवर टीका करणाऱ्या दोघांनीही विधानभवनात प्रवेश केला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांनी विधानभवानत एकत्र प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला. अगदी हसतमुखाने गप्पा मारत रोज एकमेकांवर टीका करणाऱ्या दोघांनीही विधानभवनात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, (Aditya Thackeray) अंबादास दानवे (Ambadas Danave) आणि ठाकरे गटाचे इतर आमदार उपस्थित होते. शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते.
पहा व्हिडिओ -
अधिवेशन संपता संपता दिसलेले चित्र
उपमुख्यमंत्री फडणवीस येत असताना उद्धव ठाकरे थांबले..दोघे एकत्र चालत विधी मंडळाच्या पायऱ्या चढले..
दोन जुने मित्र ' शिवसेना ' हातातून गेल्यावर एकत्र दिसले! #मैत्री #शत्रू #राजकारण pic.twitter.com/N1CR2RBSGn
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) March 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2023 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

