Maharashtra Politics: 'अजित पवार मुख्यमंत्री होणार हे एक स्वप्न'; Sharad Pawar यांचा टोला (Video)

पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची देशात 70 टक्के राज्यात सत्ता नाही आणि महाराष्ट्रातही त्यांची सत्ता जाईल.

NCP Chief Sharad Pawar (File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार हे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची देशात  70 टक्के राज्यात सत्ता नाही आणि महाराष्ट्रातही त्यांची सत्ता जाईल. जुलैमध्ये राष्ट्रवादी फोडून शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांना राज्यात लवकरच सर्वोच्च पद मिळेल, या चर्चेबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की, 'अजितदादा मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे. ही न घडणारी गोष्ट आहे.' तसेच 2024 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा: Nawab Malik Interim Bail Extends: आमदार नवाब मलिक यांच्य अंतरिम जामिनमध्ये सुप्रिम कोर्टाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now