Maharashtra Political Crisis: Ajit Pawar गटाकडे NCP च्या 40 पेक्षा अधिक आमदारांची ताकद; Praful Patel यांचा विश्वासपूर्वक दावा

पक्षांतर बंदी कायद्याखाली कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांना त्यांच्यासोबत दोन तृतीयांश पेक्षा अधिक संख्याबळ असणं आवश्यक आहे.

Prafulla Patel | Twitter

एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर नेमकी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज ANI शी बोलताना मात्र प्रफुल्ल पटेल यांनी Ajit Pawar गटाकडे NCP च्या 40 पेक्षा अधिक आमदारांची ताकद आहे असा विश्वासपूर्वक दावा केला आहे. खासदारांच्या संख्येबाबत बोलणं मात्र त्यांनी तुर्तास टाळलं आहे. दरम्यान उद्या मुंबईमध्ये अजित पवार आणि शरद पवार दोघांनीही आमदारांना बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पटेलांचा दावा खरा ठरणार का? हे चित्रही आता काही तासात उलगडणार आहे. दरम्यान जयंत पाटीलांनी शपथ घेतलेल्या 9 आमदारांना वगळता इतरांची आपल्याला साथ असल्याचा दावा केला आहे. Maharashtra Political Crisis: अजित पवारांचा गट शरद पवारांंपासून दूर गेल्यावरही का वापरतोय त्यांचा फोटो? Praful Patel यांनी स्पष्ट केली त्यांची भूमिका (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)