Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची फोन वरून 2 वेळेस चर्चा; मनसे नेत्याचा दुजोरा

महाविकास आघाडी मधून 39 शिवसेना आमदार बंड करून बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकार फूटीच्या उंबरठ्यावर आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडलेले अपक्ष आणि शिवसेना आमदारांचे बंड आता नव्या वळणावर आले आले. त्यांचा गट विलीन करायची वेळ आल्यास राजकीय पर्यायांची चाचपणी करताना त्यांच्याकडे मनसेचाही पर्याय आहे. सध्या मागील काही दिवसांत एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्यात 2 वेळेस चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंनी राजकीय परिस्थिती आणि राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं सांगितलं जात आहे. मनसे नेत्याने या दोन नेत्यांच्या फोनवरील बातचितीच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे एएनआय चं वृत्त आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement