1 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

जर बंडखोर आमदार भाजपमध्ये सामील झाले तर, एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री होण्याची दाद शक्यता आहे.

Devendra Fadanvis and Eknath Shinde (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि बंडखोर आमदार यांच्यामध्ये सुरु असलेले शीतयुद्ध आता अखेर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने शमले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंड केल्याने आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या बातमीनंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. आता माहिती मिळत आहे की, उद्या भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. यासह टीव्ही 9 मराठीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, 1 जुलै रोजी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे. जर बंडखोर आमदार भाजपमध्ये सामील झाले तर, एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री होण्याची दाद शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement