Maharashtra Kesari 2023 Winner: शिवराज राक्षे ठरला ६५व्या महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी, महेंद्र गायकवाडला चितपट करत मिळवला विजय

महेंद्र गायकवाड विरुध्द शिवराज राक्षे अशी चुरशीची लढत बघायला मिळाली.

Maharashtra Kesari 2023 Winner: शिवराज राक्षे ठरला ६५व्या महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी, महेंद्र गायकवाडला चितपट करत मिळवला विजय

Maharashtra Kesari 2023 Final: पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धाची अंतिम लढत पार पडली. यंदा महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) ठरला आहे. या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती आतापर्यन्त पाहायला मिळाल्या. दरम्यान, ‘महाराष्ट्र केसरी’ 2023 चा किताब शिवराज राक्षे याने पटकावला आहे. महेंद्र गायकवाड विरुध्द शिवराज राक्षे अशी चुरशीची लढत बघायला मिळाली. दोघांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच या अंतिम सामन्याला राज्यातील दिग्ग्ज नेत्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि उपविजेत्या महेंद्र गायकवाड हे दोघंही मालामाल होणार आहेत. विजेता आणि उपविजेत्या अशा दोघांनाही बक्षिस देण्यात येणार आहे. केसरी गदा पटकावणाऱ्या शिवराजला रोख 5 लाख रुपये, आणि महिंद्रा थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2023 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).