Maharashtra-Karnataka Border Row: हिरेबागवाडी घटनेबाबत देवेंद्र फडणविसांनी व्यक्त केली नाराजी; CM Basavaraj Bommai यांचे दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन

फडणवीस यांनी हिरेबागवाडी येथे घडलेल्या घटनांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

Devendra Fadnavis | (Photo Credit -ANI)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून कर्नाटक रक्षण वैदिक संघटनेने बेळगावमध्ये निदर्शने केली. बेळगावच्या हिरेबागवाडी येथे कर्नाटक रक्षण वैदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या ट्रकवर दगडफेक केली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. ट्रकवर दगडफेक झाल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. फडणवीस यांनी हिरेबागवाडी येथे घडलेल्या घटनांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी फडणवीस यांना दिले. उपमुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.