Maharashtra Blood Banks: महाराष्ट्रातील 93 सरकारी ब्लड बँकांवर निष्काळजीपणा बाबत कारवाई; ठोठावला लाखो रुपयांचा दंड

जर रक्तपेढीने आपला साठा अपलोड केला नाही तर त्यावर प्रतिदिन 1000 रुपये दंड आकारला जातो. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक रक्तपेढ्यांनी दैनंदिन साठा अद्ययावत करण्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

Blood Donation (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील अनेक रक्तपेढ्यांवर निष्काळजीपणामुळे कारवाई करण्यात आली आहे. रक्त उपलब्धतेची माहिती देणाऱ्या ई-रक्तकोश या वेबसाइटवर माहिती अपलोड न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील अशा अनेक रक्तपेढ्यांना 5 महिन्यांत 12,72,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अनेकदा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या कुटुंबीयांना रक्तासाठी एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत धाव घ्यावी लागते. अशावेळी रक्तपेढीमध्ये ते रक्त उपलब्ध आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सरकारने ई-रक्तकोश वेबसाइट तयार केली आहे, ज्यावर सर्व राज्यांतील रक्तपेढ्यांनी रक्ताचा साठा, म्हणजे किती युनिट्स, गट इत्यादींची माहिती दररोज अपलोड करणे गरजेचे आहे. त्याचा मूळ उद्देश असा आहे की जेव्हा रुग्णाला रक्ताची गरज असते आणि रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्त नसेल, तेव्हा तो ई-रक्तकोषमध्ये जाऊन ते रक्त कोणत्या रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे ते शोधू शकतो. रक्तपेढ्या चालवणाऱ्या राज्य रक्त संक्रमण परिषदेला (SBTC) राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी रक्तपेढ्यांनी त्यांचा साठा वेबसाईटवर दररोज अपलोड केला आहे याची खात्री करावी लागते. जर रक्तपेढीने आपला साठा अपलोड केला नाही तर त्यावर प्रतिदिन 1000 रुपये दंड आकारला जातो. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक रक्तपेढ्यांनी दैनंदिन साठा अद्ययावत करण्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. डिसेंबर 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत राज्यातील अनेक रक्तपेढ्यांवर कारवाई करण्यात आली असून 12 लाख 72 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Navi Mumbai Metro Services Begin on Line No 1 Today: नवी मुंबई मेट्रो आजपासून नागरिकांच्या सेवेत; इथे पहा तिकीट दर, वेळापत्रक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now