Maharashtra Assembly Elections: 'त्यांचे बॉस अजून त्यांना महाराष्ट्रात निवडणूक घेण्याची परवानगी देत नाहीत'; Aaditya Thackeray यांची Election commission वर टीका

शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेला उशीर करत असल्याबद्दल निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला.

Aaditya Thackeray | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Assembly Elections: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. हरियाणा आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यकाळ काही दिवसांच्या फरकाने संपणार असल्याने, दोन्ही राज्यांमध्ये एकत्र निवडणुका होतील अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने सांगितले की, महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमधील अतिरिक्त सुरक्षा आवश्यकता, महाराष्ट्रातील पाऊस आणि राज्यातील सण-उत्सवांमुळे महाराष्ट्रात नंतर निवडणुका होतील. यानंतर

ठाकरे म्हणतात, ‘केंद्राच्या ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ घोषणेचे काय झाले. आयोगाने जम्मू आणि काश्मीरसोबत महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेण्यास नकार दिला. याचे कारण, ‘सुरक्षा दलांवर मर्यादा’ असे नमूद केले. यावरून दहशतवादी हल्ले वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अजून एक कारण दिले ते म्हणजे, महाराष्ट्रातील ‘पाऊस’. याचा अर्थ फक्त महाराष्ट्रातच मान्सून आहे, इतर राज्यांमध्ये नाही?. मला वाटते निवडणूक आयोगाचे बॉस अजून त्यांना महाराष्ट्रात निवडणुका घेण्याची परवानगी देत ​​नाहीत. त्यांच्या कंत्राटदारांना आमचे राज्य लुटण्याची मुभा देण्यासाठी निवडणूक आयोग त्यांना श्वास घेण्यास वेळ देत आहे असे दिसते!’ (हेही वाचा; Maharashtra Assembly Elections: अजून का झाली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा? Election Commission ने सांगितले कारण)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)