Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली दुसरी यादी; Amit Thackeray यांना माहीममधून उमेदवारी
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना त्यांचा गृह मतदारसंघ माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली दुसरी यादी; Amit Thackeray यांना माहीममधून उमेदवारीआगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 45 उमेदवारांची नावे आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना त्यांचा गृह मतदारसंघ माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. चुलत भाऊ आदित्य ठाकरे यांच्यानंतर निवडणूक लढवणारे अमित ठाकरे हे दुसरे ठाकरे ठरणार आहेत. कल्याण ग्रामीणमधून विद्यमान आमदार राजू रतन पाटील, भांडूप पश्चिममधून शिरीष सावंत, वरळीतून संदीप देशपांडे, ठाण्यातून अविनाश जाधव, कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून साईनाथ बाबर, खडकवासल्यातून मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतील बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, मात्र आता विधानसभा निवडणुका ते स्वबळावर लढत आहेत. (हेही वाचा: Diary of Home Minister Book: 'महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याच्या कटाचे खोटे आरोप'; Anil Deshmukh विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित करणार पुस्तक)
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली दुसरी यादी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)