Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश
मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना पगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून, या मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना पगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. डॉ. सुहास दिवसे यांनी म्हटले आहे, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास पुणे विभाग सहाय्यक कामगार आयुक्त श्री. नि. अ. वाळके, भ्रमणध्वनी क्र.९९७५९३३४१६, श्रीमती त श. अत्तार, भ्रमणध्वनी क्र. ९८९०४२४८१३, श्री. डी. डी. पवार, भ्रमणध्वनी क्र. ७७७५९६३०६५, दुकाने निरीक्षक श्री. बी. व्ही. लांडे, भ्रमणध्वनी क्र. ९९२१९७११६३, श्री. राजेंद्र ताठे, भ्रमणध्वनी क्र. ९४२०७६३१११ तसेच अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या alcpune५@gmail.com व कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा या कार्यालयाच्या dyclpune२०२१@gmail.com ई-मेल आयडीवर तक्रार दाखल करावी. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: पुणेकरांनो लक्ष द्या! विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वारगेट परिसरामध्ये वाहतूक बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग)
Maharashtra Assembly Elections 2024-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)