Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक कालावधीत 13 ते 20 नोव्हेंबर सायंकाळी 6.30 पर्यंत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
मतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल.
Maharashtra Assembly Elections 2024: भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.
त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024: देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज)
Maharashtra Assembly Elections 2024:
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (#ओपिनियन व #एक्झिटपोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ पासून २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ६.३० वाजेपर्यंत प्रतिबंध लागू राहतील. निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे हे स्पष्ट केले आहे. pic.twitter.com/TMwHkpUFB1
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2024 12:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

