Maharashtra Assembly Election 2024: 'महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळायला हव्या'; MNS ची मागणी, 7 ते 13 ऑगस्टदरम्यान राबवणार 'रोजगार हक्क सप्ताह'
महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या, यासाठी नवी मुंबई मनसेने 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान 'रोजगार हक्क सप्ताह’ सुरू' केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024: मनसेने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पक्षाने राज्यात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नुकताच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौरा सुरु झळा आहे. त्यानंतर आता पक्षाने बेरोजगार तरुणाच्या समस्येवर लक्ष्य केंद्रित केले आहे. नवी मुंबईकरांच्या हक्काच्या रोजगारासाठी, मनसेने 'रोजगार हक्क सप्ताह’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सही मोहीम, घरोघरी पत्रक वाटप, बेरोजगारांचे बायोडाटा गोळा करणे, विविध आस्थपणांना व कंपन्यांना निवेदन देऊन मनसे जनजागृती अभियान राबविणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या, यासाठी नवी मुंबई मनसेने 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान 'रोजगार हक्क सप्ताह’ सुरू' केला आहे. या संदर्भात मनसेने आज नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. नवी मुंबईतील ज्या युवकांना बायोडाटा देऊन अशी नोंदणी करायची असेल त्यांनी 9819113336 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा connect.gajanankalemns@gmail.com या ई मेलवर संपर्क करू शकता. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा; 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)