मुंबईमध्ये 17 डिसेंबरला महाविकास आघाडी काढणार महामोर्चा; Uddhav Thackeray यांची घोषणा
महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्यांनी राज्याचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकत्र यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
आज आगामी हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंततर महाविकास आघाडीने एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडी 17 डिसेंबरला महामोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, ‘कर्नाटक वरचेवर महाराष्ट्रातील जत, सोलापूरसारखे काही भाग, गावे आणि जिल्हे मागत आहे. उद्या ते आमच्या पंढरपूरच्या विठोबालाही मागतील का? यामुळे एक प्रश्न निर्माण होतो- महाराष्ट्रात सरकार आहे का?.’
ते म्हणाले, ‘या 17 डिसेंबरला आम्ही सध्याचे राज्य सरकार आणि राज्यपालांच्या विरोधात मुंबईतील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा 'मोर्चा' काढणार आहोत.’ महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्यांनी राज्याचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकत्र यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘गुजरात निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने काही व्यवसाय तेथे हलवण्यात आले, त्याप्रकारे कर्नाटक निवडणुकीपूर्वी आमची गावे कर्नाटकला देणार का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)