HC On Wife Paying Maintenance To Husband: मद्रास हायकोर्टाने फॅमिली कोर्टाचा पत्नीकडून पतीला मिळणार्या आर्थिक मदतीचा निर्देश केला रद्द; पहा काय घडलं
पत्नीने पतीला गुजराण करण्यासाठी मदत करण्याचे फॅमिली कोर्टाचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत.
मद्रास हाय कोर्टात एका घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये पतीवर अॅन्जिओप्लास्टी झाल्याने त्याच्या खाण्या-पिण्यासाठी पत्नीने त्याला 20 हजारांची मदत करावी अशा स्वरूपाचा फॅमिली कोर्टाचा निकाल हाय कोर्टाने रद्द करत पत्नीची याचिका स्वीकारली आहे. पतीवर अॅन्जिओप्लास्टी झाली असली तरीही हा असा मोठा हृद्यविकार किंवा आजार नाही की ज्यामुळे पती कामचं करू शकत नाही असं म्हणत कोर्टाने फॅमिली कोर्टाचे आदेश रद्द केले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)