Madhya Pradesh: तरुणीला छेडणाऱ्या पोलिसाकडून धुलाई, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तरुणींना छेडणाऱ्या एका रोडरोमीओची मध्यप्रदेश पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने चांगलीच धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर येथील आहे.

Madhya Pradesh: तरुणीला छेडणाऱ्या पोलिसाकडून धुलाई, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तरुणींना छेडणाऱ्या एका रोडरोमीओची मध्यप्रदेश पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने चांगलीच धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर येथील आहे. आरोपी हा काँग्रेस पक्षाचा युवा कार्यकर्ता आहे. लेटेस्टली मराठी तरुणाच्या राजकीय पक्ष आणि व्हिडिओची पुष्टी करत नाही. सदर घटना ही सिव्हील लाईन पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

आरोपीचे नाव अजय प्रताप सिंह बघेल असे आहे. तो काँग्रेस पक्षाचा झोपडपट्टी विभागाचा उपाध्यक्ष आहे. सांगितले जात आहे की, तो तरुणीशी कथीतरित्या छेडछाड करत होता. दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हा प्रकार निदर्शनास आला.त्याने जाब विचारला असता आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हात उगारला. त्यामुळे मग पोलिसांनी त्याची चांगलीच धुलाई केली.

आरोपी विरोधात सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर भादंसं कलम 353, 332, 186, 294, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक झाली आहे. (हेही वाचा, विग लावून दुसरे लग्न करण्यास पोहचला नवरा, बिंग फुटताच मुलीच्यांकडून बेदम मारहाण (Watch Video))

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2023 12:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).