Lokshahi Channels License Suspended: लोकशाही मराठीचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित; I&B Ministryची कारवाई, प्रक्षेपण बंद करण्याचे निर्देश (Watch)
याआधी 14 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओचे वृत्त दिल्यानंतर ही वाहिनी सरकारी स्कॅनरखाली आल्याचा आरोप वृत्तवाहिनीने केला आहे.
I&B Ministry Cancels Lokshahi Channels License: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘लोकशाही मराठी’ या मराठी वृत्तवाहिनीचा परवाना मंगळवारी 30 दिवसांसाठी निलंबित केला. मंत्रालयाने नोटीस देऊन लोकशाही मराठीचे मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून पुढील 30 दिवसांसाठी प्रक्षेपण बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी 14 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओचे वृत्त दिल्यानंतर ही वाहिनी सरकारी स्कॅनरखाली आल्याचा आरोप वृत्तवाहिनीने केला आहे.
वृत्तवाहिनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘लोकशाही मराठीने आपले लोकशाही कर्तव्य पार पाडण्यात निर्भय पत्रकारितेचे प्रदर्शन करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली 14 जुलै 2023 रोजी एका बातमीमुळे 72 तासांच्या शटडाऊनची सूचना देण्यात आली. यानंतर, आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली व हे शटडाऊन यशस्वीरित्या उठवले. मात्र, मंत्रालयाने आता लोकशाही मराठीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबतही कायदेशीर लढाईसाठी तयार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे जिथे एखाद्या वाहिनीला ऑपरेशन बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.’ (हेही वाचा: Lokshahi Off Air For 72 Hours: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नोटिशीनंतर लोकशाही वृत्तवाहिनी 72 तासांसाठी निलंबित; भाजप नेते Kirit Somaiya यांचा व्हिडिओ प्रसारित करणे पडले महागात)
Important Update
License of Lokshahi Marathi has been suspended by Ministry of Information and Broadcasting for 30 Days. https://t.co/IG1Ogj5NUy
— Kamlesh Sutar (@kamleshsutar) January 9, 2024
लोकशाही मराठी चॅनल 30 दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश! #दडपशाही #lokshahimarathi #लोकशाहीमराठी #supportlokshahimarathi@kamleshsutar @LokshahiMarathi pic.twitter.com/Cbp7dNwM6L
— प्रतिक मुंबईकर (@MumbaikarPratik) January 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2024 08:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

