Lok Sabha Polls 2024: काँग्रेस नेते Naseem Khan यांचा पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून राजीनामा; महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न दिल्याने नाराज

पक्षाच्या अन्यायकारक निर्णयावर मी नाराज आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Naseem Khan, Mallikarjun Kharge

Lok Sabha Polls 2024: काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. पक्षाच्या अन्यायकारक निर्णयावर मी नाराज आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

आपल्या पत्रात ते म्हणतात, 'महाराष्ट्राच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी स्टार प्रचारकांच्या यादीत माझे नाव समाविष्ट केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. मात्र मी तुम्हाला कळवू इच्छितो की मी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही.' याचे कारण देताना ते म्हणतात, 'महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांवरून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाराष्ट्रभरातील अनेक मुस्लिम संघटना, नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांना काँग्रेस किमान 1 उमेदवार देईल अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही.' (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत 53.51 टक्के मतदान; हिंगोलीमध्ये सर्वात कमी)

पहा एक्स पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)