Lok Sabha Election 2024 Results: 'त्यांनी आमचे सरकार पाडले, आमचा पक्ष फोडला...'; निवडणूक निकालानंतर Aaditya Thackeray यांनी व्यक्त केल्या भावना (See Post)

शिंदे गटाने वेगळा पक्ष स्थापन करून एनडीएमध्ये प्रवेश केला. मात्र महाराष्ट्रातील जनतेने ते पूर्णपणे नाकारले. ठाकरे गटाने जवळजवळ 9 जागा जिंकल्या असून, एकनाथ शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

Lok Sabha Election 2024 Results: उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी महाविकास आघाडीला मोठा दिलासा दिला. महाराष्ट्रात भाजपचे मोठे नुकसान झाले असून, कॉंग्रेस एक मोठा पक्ष म्हणून पुन्हा उदयास आला आहे. या सर्वांमध्ये उद्धव ठाकरे गटाने उत्कृष्ट कामगिरी दाखवली. निकराच्या लढतीत उद्धव ठाकरे गटाने अनेक जागांवर बाजी मारली आहे. शिंदे गटाने वेगळा पक्ष स्थापन करून एनडीएमध्ये प्रवेश केला. मात्र महाराष्ट्रातील जनतेने ते पूर्णपणे नाकारले. ठाकरे गटाने जवळजवळ 9 जागा जिंकल्या असून, एकनाथ शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत.

आता या निकालानंतर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मिडियावर ते म्हणतात, ‘त्यांनी आमचे सरकार पाडले. त्यांनी आमचा पक्ष फोडला. त्यांनी आमचे चिन्ह चोरले. त्यांनी आमचे नेते, खासदार, आमदार चोरले. त्यांच्या बेकायदेशीर आणि महाराष्ट्रविरोधी राजवटीने संपूर्ण व्यवस्थेचा आपल्याविरुद्ध गैरवापर केला. लोकशाही संपवणे आणि आपली राज्यघटना बदलणे हा त्यांचा हेतू आहे. आम्ही नवीन चिन्ह, नवीन नावासह निवडणूक लढवली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी जनतेचे प्रेम उभे असल्याचे दिसले. आज इंडिया-मविआ युतीच्या संख्येसह, आम्ही महाराष्ट्राचे मनापासून आभारी आहोत.’ (हेही वाचा: Indian General Election Results 2024: सत्ता स्थापनेचा दावा हा करायलाच हवा - उद्धव ठाकरे)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now