Lok Sabha Election 2024 Results: बारामतीमध्ये Supriya Sule विजयी, सलग चौथ्यांदा झाल्या खासदार; वाहिनी सुनेत्रा पवारांचा केला पराभव
सुळे यांनी आतापर्यंत तीनवेळा बारामतीचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले असून, आता चौथ्यांदा त्या बारामतीच्या खासदार झाल्या आहेत.
Lok Sabha Election 2024 Result: महाराष्ट्रातील व्हीआयपी जागांपैकी एक असलेल्या बारामतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले होते. आता या ठिकाणचे निकाल स्पष्ट झाले आहेत. बारामती लोकसभा जागेवर शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे या त्यांचा चुलत भाऊ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत होत्या. आता बारामती जागेवरून सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. सुळे यांनी आतापर्यंत तीनवेळा बारामतीचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले असून, आता चौथ्यांदा त्या बारामतीच्या खासदार झाल्या आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या लढतीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आता या निकालामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठा धक्का बसला आहे. याआधी 2019 मध्ये त्यांचा मुलगा पार्थ पवारच्या पराभवानंतर आता 2024 मध्ये पत्नीचा पराभव झाला आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Results: मुंबईमधील 6 पैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात, तर अजित पवार गटाला रायगडमधून सुनील तटकरेंद्वारे एक जागा मिळवण्यात यश)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)