Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर Ajit Pawar यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले- 'कुठलंही अपयश अंतिम नसतं...'

त्यांचा पक्ष केवळ एक जागा जिंकू शकला आहे.

Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

Lok Sabha Election 2024 Results: संपूर्ण देशाला चकित करणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालांमध्ये महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निवडणुकीत काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनीही स्ट्राइक रेटच्या बाबतीत उत्तम कामगिरी दाखवली आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. त्यांचा पक्ष केवळ एक जागा जिंकू शकला आहे. या निकालानंतर आता अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ते म्हणतात, ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.’ (हेही वाचा: Indian General Election Results 2024: सत्ता स्थापनेचा दावा हा करायलाच हवा - उद्धव ठाकरे)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)