Lok Sabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर Ajit Pawar यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले- 'कुठलंही अपयश अंतिम नसतं...'
या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. त्यांचा पक्ष केवळ एक जागा जिंकू शकला आहे.
Lok Sabha Election 2024 Results: संपूर्ण देशाला चकित करणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालांमध्ये महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निवडणुकीत काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनीही स्ट्राइक रेटच्या बाबतीत उत्तम कामगिरी दाखवली आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. त्यांचा पक्ष केवळ एक जागा जिंकू शकला आहे. या निकालानंतर आता अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ते म्हणतात, ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.’ (हेही वाचा: Indian General Election Results 2024: सत्ता स्थापनेचा दावा हा करायलाच हवा - उद्धव ठाकरे)
पहा पोस्ट-
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री मा.श्री. @narendramodi साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 08:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

