Lok Sabha Election 2024: मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई; मुंबई जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(File Image)

मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.

मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी मतदारांना दोन तासांची सवलत द्यावी, मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now