Local Body Elections: 18 जानेवारीला राज्यात 95 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका; मतदानासाठी सावर्जनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्र सरकार कडून 18 जानेवारीला महाराष्ट्रात मतदान असलेल्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credits: Getty Images)

18 जानेवारीला राज्यात 95 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता निवडणुका होत आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुका होणार आहेत. या मतदानासाठी सावर्जनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

MAHARASHTRA DGIPR ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement