Devendra Fadnavis On Caste Based Census: राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेचा अर्थ सांगावा, त्यानंतर मी उत्तर देईल; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
राहुल गांधी यांच्या जातीनिहाय जनगणनेच्या विधानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेचा अर्थ सांगावा, मग मी उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis On Caste Based Census: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या जातीनिहाय जनगणनेच्या विधानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेचा अर्थ सांगावा, मग मी उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी जातीवर आधारित जनगणनेवर विधान केलं. यासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मला देशातील ओबीसी लोकसंख्या किती आहे हे जाणून घ्यायचे आहे. मला माहित आहे की ओबीसी लोकसंख्या सुमारे 50 टक्के आहे. मी पंतप्रधान मोदींना जातीवर आधारित जनगणना करण्यास सांगितले. पंतप्रधान मोदींनी एका भाषणात म्हटले होते की, भारतात जात नाही. भारतात फक्त गरीब लोक आहेत. मध्य प्रदेशात आमचे सरकार आल्यावर आम्ही जातीवर आधारित जनगणना करू. आपली लोकसंख्या किती आहे आणि अर्थसंकल्प व सरकारवर त्यांचा किती अधिकार आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. (हेही वाचा - Nitin Gadkari On Asembly Polls 2023: 5 पैकी किती राज्यात भाजप जिंकणार? नितीन गडकरींनी सांगितली भविष्यवाणी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)