Viral Video: व्यस्त महामार्गावर बिबट्याला कारची धडक, गंभीर जखमी; वन्यजीवांबद्दल सरकार उदासीन? (Watch)
संपूर्ण जग वन्यजीवांबद्दल चिंतेत असताना एका महामार्गावर बिबट्याला कारने धडक दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातामध्ये बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कारची धडक बसल्यानंतर बिबट्या गाडीच्या बोनेटखाली अडकला असून, तिथून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
संपूर्ण जग वन्यजीवांबद्दल चिंतेत असताना एका महामार्गावर बिबट्याला कारने धडक दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातामध्ये बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कारची धडक बसल्यानंतर बिबट्या गाडीच्या बोनेटखाली अडकला असून, तिथून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. ड्रायव्हरने गाडी थोडीशी मागे घेतल्यानंतर बिबट्या उभा राहतो आणि पळून जात असल्याचेही दिसत आहे. हा व्हिडीओ जीवशास्त्रज्ञ मिलिंद परिवाकम यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी अंडरपास बांधण्याची मागणी केली आहे, जेणेकरून प्राण्यांना रस्ते शांततेने ओलांडण्यास मदत होईल.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)