Latur News: दुचाकीची तोडफोड करणारे दोन पोलिस निलंबित; लातुर मधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
लातूर जिल्ह्यातील लोककला केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या काही दुचाकींची तोडफोड केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटने प्रकरणी सोमवारी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
Latur News: लातूर जिल्ह्यातील लोककला केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या काही दुचाकींची तोडफोड केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटने प्रकरणी सोमवारी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कैमरात कैद झाली आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे दोन पोलिस कार मधून उतरले आणि औसा तहसीलमधील शिंदाळा गावाच्या हद्दीतील लोककला केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या दुचाकींना लाथ मारून आणि तोडफोड करताना दिसले. ही घटना 20 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली आहे. या संदर्भात सहाय्यक पोलिस निरिक्षक बाळासाहेब डोंगरे हे तपास करत आहे. या घटनेअंतर्गत पोलिस कर्मचारी सहाय्यक उपनिरिक्षक आणि पोलिस नाईक यांना निंलबित केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)