Kunal Kamra Song on Eknath Shinde: कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिपण्णीनंतर शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची धमकी, म्हणाले- 'भारतात कुठेही मोकळेपणाने फिरू देणार नाही' (Video)
उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘तुमची स्थिती बघून आम्हाला वाईट वाटते. आमच्यावर टीका करण्यासाठी तुमच्याकडे कार्यकर्तेही नाहीत, तुम्ही एका भाड्याने घेतलेल्या स्टँड-अप कॉमेडियनचा वापर केलात.'
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून महाराष्ट्रात एक नवीन वाद सुरू झाला आहे. कुणाल कामराने याने एका शोमध्ये शिंदे यांच्याबाबत ‘गद्दार’ हा शब्द वापरून टीका केली होती. या मुद्द्यावर शिंदे गटाचे आमदार, खासदार, कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कुणालविरुद्ध अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार (शिंदे गट) नरेश म्हस्के यांनीही कुणाल कामराचा खरपूस समाचार घेतला. खासदार म्हणाले की, ‘कुणाल कामरा एका भाडोत्री कॉमेडियन असून, काही पैशांसाठी तो आमच्यावर टीका करत आहे. कुणाल तू आता केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात फिरू शकत नाहीस. आमचे शिवसैनिक तुला तुझी जागा दाखवतील.’
उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘तुमची स्थिती बघून आम्हाला वाईट वाटते. आमच्यावर टीका करण्यासाठी तुमच्याकडे कार्यकर्तेही नाहीत, तुम्ही एका भाड्याने घेतलेल्या स्टँड-अप कॉमेडियनचा वापर केलात. संजय राऊत हिम्मत असेल तर तुम्ही स्वतः आमच्यावर टीका करा. कुणालला आमची माफी मागावी लागेल.’ (हेही वाचा: Kunal Kamra Song on Eknath Shinde: कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वाद; FIR दाखल, संतप्त शिवसैनिकांनी हॉटेल आणि स्टुडिओची केली तोडफोड)
नरेश म्हस्के यांची कुणाल कामराला धमकी:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)