Kolhapur Panchganga Water Level: कोल्हापूरात पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यातील 76 गावांना भूस्खलनाचा धोका असून या गावातील लोकानां स्थलांतरीत होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. पावसामुळे पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीला (Panchganga River) मोठा पूर आला असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुट 03 इंचावर गेली असून नदीच्या धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट झाल्या असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Mumbai Pune Express Landslide: आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटनेमुळे वाहतुक सेवा ठप्प)
कोल्हापूरात पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असून नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 76 गावांना भूस्खलनाचा धोका असून या गावातील लोकानां स्थलांतरीत होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यामध्ये शाहूवाङी, पन्हाळा, करवीर, भुदरगड, गडहिंग्लज, राधानगरी, कागल, आजरा, चंदगड आदी तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)