संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर Kirit Somaiya यांची पहिली प्रतिक्रिया-'ठाकरे आणि राऊत कोविड सेंटर घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत?'
यामध्ये त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलुंडचा दलाल असा उल्लेख करत, सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद नुकतेच पार पडली. यामध्ये त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलुंडचा दलाल असा उल्लेख करत, सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आता किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्वीटच्या माध्यमातून ते म्हणाले आहेत की, '2017 मध्येदेखील संजय राऊत, सामना वृत्तपत्राने अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे माझी पत्नी प्रा डॉ मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी माझा मुलगा नील सोमय्याचे नाव घेतले आहे. आत्तापर्यंत सरकारच्या नेत्यांनी माझ्याविरुद्ध 10 खटले दाखल केले असून, आणखी 3 खटल्यांची प्रक्रिया सुरु आहे.'
ते पुढे म्हणाले, ' मला त्यांची परिस्थिती समजते. मी आणखी एक प्रकरण/तपासाचे स्वागत करतो आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही किंवा कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात गुंतलेलो नाही. दुसरीकडे, कोविड सेंटर घोटाळ्याबाबत ठाकरे आणि राऊत का बोलत नाहीत? तसेच प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी काय संबंध आहे याबाबतही काही विधान करत नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा सुरूच राहणार आहे.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)