Viral Video: 'रेनकोट कुठयं त्याचं' गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर निरागस प्रश्न विचारणार्या मुलाचा व्हीडिओ वायरल (Watch Video)
पावसात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये तुफान वायरल होत आहे.
लहान मुलांचे अनेक प्रश्न मोठ्यांना निरुत्तरीत करणारे असतात. असाच एका चिमुकल्याचा निरागस प्रश्न सध्या नेटकर्यांमध्ये हीट ठरला आहे. पावसाचा आनंद घेता घेता गणपती बाप्पाचं रूप पाहण्यासाठी आलेल्या या चिमुकल्याने त्याच्या घरातील व्यक्तीला 'बाप्पाचं रेनकोट कुठयं' असा सवाल विचारला त्यावर समोरून तो त्याला नसतो फक्त तुलाच असं उत्तर आले. दरम्यान या मुलानेही श्रद्धेने बाप्पासमोर हात जोडल्याचं या व्हिडिओ मध्ये पहायला मिळालं आहे. नेटकर्यांनी या निरागस प्रश्नावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. नक्की वाचा: Viral Video: 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स व्हायरल, डान्स स्टेप पाहून नेटीझन्स खूश, Watch .
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)