Kasara Railway Station येथे मोटरमनच्या केबिनमध्ये विनापरवाना प्रवेश, दोन तरुणांना अटक

रेल्वे मोटरमनच्या केबिनमध्ये विनापरवाना प्रवेश केल्याबद्दल दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना कसारा रेल्वे स्टेशन येथे घडली. हे दोन तरुण रील बनविण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी मोटरमनच्या केबिनमध्ये विनापरवाना प्रवेश केला.

दरम्यान, कारवाई केल्यानंतर मध्य रेल्वेने म्हटले आहे की, नियमांचे उल्लंघन केल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास सदर घटनेबाबत माहिती देण्यासाठी 9004410735 किंवा 139 या फोन क्रमांकावर संपर्क साधून तत्काळ माहिती द्या.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now