Karnataka-Maharashtra Border Row: कगनोळी टोल प्लाझा जवळ महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचं आंदोलन; सीमाप्रश्नी आक्रमक
बेळगावामध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला अचानक परवानगी नाकारत कलम 144 लागू करत कर्नाटक सरकारने जमावबंदी लागू केली आहे. मात्र या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून येणार्या महाविकास आघाडीमधील नेत्यांना कगनोळी टोल नाक्याजवळ रोखण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती कडूनही याबाबत आंदोलन सुरू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. नक्की वाचा: Maharashtra Karnataka Border Row: कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)