Karnataka CM Oath Ceremony: कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला Sharad Pawar राहणार उपस्थित; Congress अध्यक्षांनी फोन करून दिले निमंत्रण

काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची ताकद दाखवण्यासाठी देशातील अनेक मुख्यमंत्री आणि मान्यवर नेत्यांना आमंत्रित केले आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ANI)

काँग्रेस नेते सिद्धरामय्या उद्या म्हणजेच शनिवारी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बेंगळूरू येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे, ज्याची तयारी पूर्ण झाली आहे. काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची ताकद दाखवण्यासाठी देशातील अनेक मुख्यमंत्री आणि मान्यवर नेत्यांना आमंत्रित केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव, एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित केले आहे. कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

याबाबत माहिती देताना पवार म्हणाले की, ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भात मला काँग्रेस अध्यक्षांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाला अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले आहे आणि मला या समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मी उद्या कर्नाटकात जाणार आहे.’ (हेही वाचा: बेंगळुरू येथे 20 मे रोजी होणार सिद्धरामय्या यांचा शपथविधी सोहळा; कॉंग्रेसकडून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील अनेक मान्यवर नेत्यांना निमंत्रण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now