Jayant Patil Tests Positive for Dengue: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण; सोशल मिडियावर रिपोर्ट शेअर करत दिली माहिती

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांनी एक्स सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे.

Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

याआधी दसऱ्याच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली होती. आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांनी एक्स सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे. याबाबत जयंत पाटील म्हणतात. ‘कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन.’ ब्रीच कँडी रूग्णालयाचा तपासणी अहवाल जयंत पाटलांनी शेअर केला आहे. (हेही वाचा: Sharad Pawar On Caste certificate: 'जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही', शरद पवार यांचे जात प्रमाणपत्रावरुन स्पष्ट भाष्य)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now