'औरंगजेबाचे फोटो झळकवणे मान्य नाही, कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही'- Devendra Fadnavis

रविवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. एका उरूसादरम्यान चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढली गेली होती. या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो झळकले.

'औरंगजेबाचे फोटो झळकवणे मान्य नाही, कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही'- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागात काही तरुण औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. एका उरूसादरम्यान चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढली गेली होती. या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो झळकले. आता त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, ‘औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर ते इथे मान्य केले जाणार नाही. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजच आहेत. कोणी औरंग्याचे नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही.’ (हेही वाचा: शिवसेना ठाकरे गट "आवाज कुणाचा" नावाचा पॉडकास्ट करणार सुरु, जनतेच्या मनातील प्रश्न मांडणार)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2023 07:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).